बगळा (नाम)
मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
त्रास (नाम)
जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.
खडतर (विशेषण)
जाता न येण्यासारखे.
वाळवी (नाम)
लाकूड, कागद खाणारा एक किडा.
बेअब्रू (नाम)
एखाद्याचा मान, प्रतिष्ठा भंग करणारी गोष्ट.
पेज (नाम)
तांदूळ शिजल्यानंतर भातातील काढलेले पाणी.
हळवा (विशेषण)
सहज दुखावला जाईल असा.
बिब्बा (नाम)
सुमारे ९-१५ मीटर उंचीचे पानझडी वृक्ष.
महागडा (विशेषण)
ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा.
नियोजन (नाम)
एखादे काम योग्य प्रकारे वा पूर्ण व्हावे म्हणून केलेली आखणी.