सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.
उदाहरणे : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.
समानार्थी : जाणीव, भान
अर्थ : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.
उदाहरणे : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
अर्थ : भेसळ नसलेले.
उदाहरणे : उत्खननात खर्या सोन्याची नाणी सापडली.
समानार्थी : अस्सल, खरा, चोख, चोखट, निके, निर्भेळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो बिना मिलावट का हो या एकदम अच्छा।
Free of extraneous elements of any kind.
अर्थ : भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला.
उदाहरणे : तुमचे उत्तर बरोबर आहे. शुद्ध वाक्यांना चिन्हांकित करा.
समानार्थी : बरोबर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो गलत न हो।
अर्थ : परिशुद्ध केलेला.
उदाहरणे : हे खर्या सोन्याचे बिस्कीट आहे.
समानार्थी : अस्सल, खरा
जो परिशुद्ध हो।
अर्थ : ज्या संपादन कार्यात अनुचित किंवा नियमाविरूद्ध गोष्ट नाही असा.
उदाहरणे : स्पष्ट व्यवहार असले की बरे.
समानार्थी : स्पष्ट
जिसके सम्पादन में अनुचित या नियम-विरुद्ध बात न हो।
स्थापित करा