ससाणा (नाम)
घारीपेक्षा लहान आकाराचा, बाकदार चोच आणि तीक्ष्ण नख्या असलेला शिकारी पक्षी.
प्रवेश (नाम)
विशिष्ट नियम पूर्ण करून एखाद्या क्षेत्रात पोहोचणे.
लेखक (नाम)
कथा, कादंबरी, लेख इत्यादी रचना करणारी व्यक्ती.
ताबडतोब (क्रियाविशेषण)
विलंब न करता.
लढाऊ (विशेषण)
युद्धात कामी येणारा.
मीठ (नाम)
खाद्यपदार्थांना चव येण्यासाठी त्यात घातला जाणारा एक क्षारयुक्त पदार्थ जो समुद्राच्या पाण्यापासून प्राप्त होतो..
बेअब्रू (नाम)
एखाद्याचा मान, प्रतिष्ठा भंग करणारी गोष्ट.
सोंगटी (नाम)
बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
कमळ (नाम)
तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
उशीर (नाम)
ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.